Ad will apear here
Next
नूपुरनाद महोत्सव तीन व चार फेब्रुवारीला
पत्रकार परिषदेत माहिती देताना डावीकडून कौशिक मराठे, डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर.पुणे : येथील भैरवी संगीत प्रसारक मंडळातर्फे तीन आणि चार फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नूपुरनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भरतनाट्यम नृत्यांगना पद्मभूषण विदुषी अलारमेल वल्ली यांचे अनेक वर्षांनंतर पुण्यात सादरीकरण होणार आहे.

त्याचप्रमाणे पंडित जयतीर्थ मेवुंडी व पंडित प्रवीण गोडखिंडी यांची गायन व बासरीची जुगलबंदी आणि पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन आणि पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. नूपुरनाद महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपल्बध असणार आहेत.

अलारमेल वल्लीभैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. धनंजय दैठणकर, कार्यवाह डॉ. स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर व कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दैठणकर घराण्याला शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा मोठा वारसा आहे. डॉ. स्वाती दैठणकर या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, तर डॉ. धनंजय दैठणकर हे उत्कृष्ट संतूरवादक आहेत. दैठणकर दाम्पत्याचा मुलगा निनाद दैठणकर हाही उत्तम संतूरवादक आणि कन्या नुपूर दैठणकर याही उत्तम भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत. भैरवी संगीत प्रसारक मंडळाच्या माध्यमातूनही या चारही कलाकारांनी पुढाकार घेऊन या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

जयतीर्थ मेवुंडीडॉ. धनंजय दैठणकर म्हणाले, ‘भरतनाट्यम नृत्यांगना पद्मभूषण विदुषी अलारमेल वल्ली यांच्या सादरीकरणाने तीन फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाची सुरुवात होईल. अलारमेल वल्ली अनेक वर्षानंतर प्रथमच नूपुरनाद महोत्सवात सादरीकरण करत असून, पुणेकर रसिकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. उद्घाटन समारंभावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, कॉटनकिंगचे प्रदीप मराठे आदी उपस्थित राहणार आहेत.’

राहुल शर्मा‘त्यांनतर पंडित जयतीर्थ मेवुंडी व पंडित प्रवीण गोडखिंडी यांची गायन व बासरीची जुगलबंदी रंगणार आहे. तबल्यावर चारुदत्त फडके, तर हार्मोनियमवर राहुल गोळे साथ करणार आहेत. रविवारी चार फेब्रुवारीला पंडित राहुल शर्मा यांचे संतूरवादन होणार असून, त्यांना सत्यजित तळवलकर तबल्यावर साथ करणार आहेत. त्यानंतर पंडित व्यंकटेश कुमार यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, तर हार्मोनियमवर राहुल गोळे साथ करणार आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

व्यंकटेश कुमारडॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीत आणि नृत्य यासाठी हा महोत्सव समर्पित केलेला आहे. उत्कृष्ट कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य ठेवला आहे. गायन, नृत्य आणि वादन यामुळे यंदाचा महोत्सव विशेष असणार आहे. महोत्सवातून अभिजात शास्त्रीय संगीताचे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

पंडित प्रवीण गोडखिंडी‘सांस्कृतिक कार्यक्रमांना ‘कॉटनकिंग’ नेहमीच प्रोत्साहन देते. स्वतः उत्तम कलाकार असलेल्या दैठणकर कुटुंबाच्या पुढाकारातून होत असलेल्या या नूपुरनाद महोत्सवाचा आम्हीही भाग आहोत, याचा आनंद आहे. हा महोत्सव सांस्कृतिक क्षेत्रात नवी उंची गाठेल,’ असे विश्वास कौशिक मराठे यांनी व्यक्त केला.

महोत्सवाविषयी :
दिवस : तीन आणि चार फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : आयडियल कॉलनी मैदान, कोथरूड, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZPFBK
Similar Posts
बंदिशी, भैरवीने आनंदली रविवारची सायंकाळ पुणे : संतूरवर हळुवार छेडलेल्या तारा... त्यातून उमटलेले मधुर स्वर... विलंबित बंदिशीने गाठलेली उंची... मारवा रागात आलाप, जोड, झाला यामधून झालेले पंडित राहुल शर्मा यांचे सादरीकरण... त्यानंतर कल्याण, बिहाग रागात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या बंदिशींनी संगीतप्रेमींची रविवारची (चार फेब्रुवारी) सायंकाळ आनंददायी ठरली
चौधरी, भगत, जमदाडे, झुंझुरके विजयी पुणे : विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भारत-तुर्कस्थान लढतीत बाजी मारली. हिंदकेसरी साबा कोहालीला मात्र या वेळी पराभवाचा सामना करावा लागला.
पुण्यात ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी’ महोत्सवाचे आयोजन पुणे : प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू शमा भाटे यांची नादरूप नृत्य संस्था व महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने तसेच प्राज फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने २५ व २६ मे २०१९ रोजी ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात होईल
पुण्यात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा पुणे : कधी गंमती-जमती, तर कधी खट्याळ चिमटे, कधी सेटवरच्या गप्पा, तर खळखळून हसविणारे विनोदी-किस्से अशा अनोख्या हास्य जत्रेने ‘चला हवा येऊ द्या- होऊ दे व्हायरल’च्या पूर्ण चमूने पुण्यातील प्रेक्षकांना खळखळून हसविले आणि पुणेकरांनी त्यांना टाळ्या-शिट्ट्यांनी दिलखुलास दाद दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language